नराधम वसीम चौधरीला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

 नराधम वसीम चौधरीला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी


क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुले मुली क्लासचे वैभव पाहून मंत्रमुग्ध होऊन आकर्षित होऊन इथे अँडमिशन करतात त्यांना हे लिंगपिसाट त्याच्या कमजोरी चा फायदा घेऊन आपल्या जाळ्यात ओढतात.अशा घटना किंवा जिथे कुठे गुन्हे घडत असेल त्या विषयी सत्य लढ़ाशी 9970321817 या नंबरवर संपर्क साधवा.माहिती देणार्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल..

अकोला शहरातील चौधरी कोचिंग क्लासेसचा संचालक वसीम चौधरी प्रकरणात आरोपी वसीम चौधरी याची पोलीस कोठडी 30 मे पर्यंत वाढविण्यात आली होती वसीम चौधरी हा आठ दिवस पोलीस कोठडीत होता आज आरोपी वसीम चौधरीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले या घटने मुळे शिक्षणाच्या क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.. कारण ज्या ठिकाणी शिक्षणाचे धडे दिल्या जातात, विद्यार्थ्यांचं भविष्य घडतं, तिथे जर अशा घटना घडत असेल तर पालकांनी कुणावर विश्वास करावं. अशी किती तरी आईवडील आहेत जे पोटाला चिमटा घेऊन, काटकसर करून मुलांना शिकवितात.. कोचिंग कलासेस मध्ये भरमसाट फीस भरून हे पालक आपल्या मुलांचं भविष्य शिक्षकांच्या हातात सोपवितात... पण त्यांना काय माहिती की  विद्या देणारा शिक्षक हा शिक्षक नसून भक्षक आहे... आरोपी वसीम चौधरी च्या कृत्य मुळे पालकांच्या विश्वासाला तडा गेला आहे. क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुले मुली क्लासचे वैभव पाहून मंत्रमुग्ध होऊन आकर्षित होऊन इथे अँडमिशन करतात त्यांना हे लिंगपिसाट त्याच्या कमजोरी चा फायदा घेऊन आपल्या जाळ्यात ओढतात.अश्यावेळी पालकांनी पुर्ण खात्री करुनच आपल्या मुलीची अँडमिशन करावी.या साठी गरज आहे ते न घाबरता समोर येण्याची...यासाठी अनेक संघटनानी  पुढे येऊन  वसीम चौधरी वर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.. या करिता सत्य लढ़ा news ची टीम अशा गुन्हेगारी घटनांना  उजागर करण्यास तत्पर आहे.. अशा घटना किंवा जिथे कुठे गुन्हे घडत असेल त्या विषयी सत्य लढ़ाशी 9970321817 या नंबरवर संपर्क साधवा, माहिती देणार्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल... परंतु मौन साधून गुन्हेगारिला खतपाणी घालू नका असेही आव्हान करत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने