अकोला महानगरपालिकेच्या आरक्षण सोडत जाहीर
अकोला महानगरपालिकेच्या एकुण 30 प्रभागामधून 91 सदस्य निवड करण्याकरिता होऊ घतलेल्या सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण लोकसंख्ये निहाय मा.राज्य निवडणूक आयोगाने अंतीम केले असून अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने एकुण 15 प्रभागातील अनुसुचित जातीच्या उमेदावाराकरिता राखीव करण्यात आले असून, अनुसूचित जमातीचे दोन प्रभाग सुध्दा त्यानुसार राखीव करण्यात आलेले आहेत. उच्च न्यायालयानी ईतर मागास वर्गीय प्रवर्गाचे (OBC) आरक्षण नाकारल्याने एकुण 74 जागांवर सर्व साधारण प्रवर्गातील खुल्या प्रवर्गासाठी आहे. एकुण 91 जागांमधील 46 जागा त्या महिला प्रवर्गाकरिता आरक्षित करतांना 8 जागा अनुसुचित जाती महिला, एक जागा अनुसूचित जमाती महिला करिता तर उर्वरित 37 जागा सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी निश्चित करण्याकरिता आज सकाळी 11.00 वाजता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोडतीव्दारे आले आहे.

