सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण जाहीर. मात्र निवडणूक विभाग प्रमुख गैरहजर? प्रकरण भोवणार असल्याची चर्चा

 सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण जाहीर. मात्र निवडणूक विभाग प्रमुख गैरहजर? प्रकरण भोवणार असल्याची चर्चा 

कर्तव्यदक्ष आयुक्त कविता द्विवेदी एकट्या महिला आयुक्तांनी सार्वजनिक निवडणूकचे आरक्षणाचे पाहीले काम

अकोला महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात पार पाडले.कर्तव्यदक्ष आयुक्त कविता द्विवेदी एकट्या महिला आयुक्तांनी सार्वजनिक निवडणूकचे आरक्षणाचे पाहीले काम मात्र महानगरपालिकेचे निवडणूक विभाग प्रमुख, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख, या कामात गैरहजर असल्याने खरोखरच महत्त्वाचे काम होते की आयुक्तांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र होते अशी चर्चा नियोजन भवनात सुरू होती. निवडणूक विभागाशी सबंधित कोणताही कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुट्टी घेता येत नाही किंवा घेतली सुट्टी रद्द करण्यात येते ,    अकोला महानगरपालिकेचे उप आयुक्त प्रशासन उप आयुक्त विकास  निवडणूक विभाग प्रमुख आणि सा.प्र.वि.प्रमुख गैरहजर असल्याने हे प्रकरण भोवणार असल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू होती. अधिकारी जरी गैरहजर असले तरी आयुक्त तथा प्रशासक असलेल्या कविता व्दिवेदी यांनी नियोजन बध्द आखणी करून आजचा कार्यक्रम व्यवस्थित हाताळल्याने या जंपीगवाल्या अधिकार्याची गोची झाली हे विषेश. कर्तव्यदक्ष आयुक्ताना अडचणीत आणायच्या खेळीवर पाणी फेरल्याने आता पुढे काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याआधीही तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे, बिपिन शर्मा, अजय लहाने,यांच्यावरही पदाधिकारी आणि युनियन च्या माध्यमातून गुन्हे दाखल होईपर्यंत कटकारस्थान रचल्या गेले होते हे सर्वक्ष्रुत आहे.असेच आजच्या प्रकरणावरून लक्षात येते. आयुक्तांनी गाफील राहून याच्यावर विश्वास न ठेवता कार्य केल्यास यश प्राप्त होत राहील अशी चर्चा मनपात होती.सत्य लढा  जंपीगबाबत नेहमीच बातम्या प्रकाशित करत असते परंतु आयुक्ताना आपल्याकडे कर्मचारी नाही असे भासवून आपली पोळी शेकुन घेतात त्याचा प्रत्यय आज आयुक्तांच्या नजरेत आला असल्याने आता आयुक्त हा विषय कसा हाताळतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

====================================

अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण जाहीर.      



अकोला दि. 31 मे 2022 अकोला महानगरपालिकेच्‍या एकुण 30 प्रभागामधून 91 सदस्‍य निवड करण्‍याकरिता होऊ घतलेल्‍या सार्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण सोडत कार्यक्रम नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला येथे आज संपन्‍न झाले असून या सोडत कार्यक्रमाला मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी, मनपा उपायुक्‍त अनिल अढागळे, मनपा आयुक्‍त यांचे स्विय्य सहायक जितेंद्र तिवारी, नगररचनाचे संदीप गावंडे, सामान्‍य प्रशासन विभागाचे टाले प्रसिध्‍दी अधिकारी भरत शर्मा व निवडणुक विभागातील कर्मचा-यांची उपस्थिती होती. तसेच मनपा सेमी इंग्‍लीश शाळा क्रं. 7 चे वर्ग 4 चे प्रितम नृपनारायण, सोनल नृपनारायण यांच्‍या हस्‍ते ड्रॉ काढण्‍यात आला आहे.   


प्रभाग निहाय आरक्षण यादीची पी.डी.एफ. सोबत दिलेली आहे.

=================================

व्‍हॉल्‍व बसविण्‍याचे कामामुळे लोकमान्‍य नगर, गंगा नगर आणि जोगळेकर प्‍लॉट येथील जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा 1 आणि 2 मे रोजी बंद राहणार.      


अकोला दि. 31 मे 2022  –  केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत अकोला महानगरपालिका पाणी पुरवठा योजना Scada व Automation करीता गंगा नगर व जोगळेकर प्लॉट येथील जलकुंभावर  नवीन Valve बसविण्याचे काम प्रस्तावित असून त्यामुळे दिनांक 1 व 2 जून 2022 रोजी लोकमान्य नगर, गंगा नगर, व जोगळेकर प्लॉट येथील जलकुंभवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहील करिता या परिसरातील नागरिकांनी पाण्याची पुरेशी साठवणूक करावी व पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग मनपा अकोला यांनी केले आहे.

 ===============================

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक;आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

अकोला दि.31(जिमाका)-  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्‍या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्‍या,तसेच नव्‍याने स्‍थापित ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम याप्रमाणे :

1.      शुक्रवार दि. 3 जून 2022 रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देणे.

2. सोमवार दि. 6 जून रोजी विशेष ग्रामसभा बोलवून तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत काढणे.

3.  मंगळवार दि. 7 जून रोजी सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे.

4.मंगळवार दि. 7 ते 10 जून 2022 या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे.

5. बुधवार दि. 15 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अभिप्राय देणे.

6. शुक्रवार दि. 17 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस(नमुना अ) जिल्हाधिकारी यांची मान्यता देणे.

7. सोमवार दि. 20 जून रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला(नमुना अ) व्यापक प्रसिद्धी देणे.

===========================================

बाळापूर महसुल विभागाचे अधिकारी फुल एक्षन मोठ मध्ये तर कर्मचारी चा वाळु वहातुकी व्हाणा वर का चुप्पी


लोहारा . हाता . सोनाळा . बोरगाव वैराळे . हातरूण .वाळु वहातुक जोमात मंडळ अधिकारी व तलाटी कोमात

बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या 11 वाळु घाटापैकि फकत 4 वाळु घाटांचा लिलाव करन्यात आले आहेत अशीमाहेती आहेत मात्र वाळु घाटांचा लिलाव न झालेल्या .हाता . लोहारा . अंदुरा सोनाळा . बोरगाव वेराळे . हातरूण आदि सह नदि पात्रातुन रात्रदिवर अवेधवाळु उपसा करूण ट्रक . ट्रेकटर  व्हातुक करित आहेत व नदि पात्रातुन वाळु उपसा करन्याचे चित्र दिसत आहे या अवैध वाळु करनाऱ्यावर तथा अवेघ वाळु माफीयावर व तसेच  अवैघ . विट भट्ट्यावर .बाळापुर  महेसुल विभागचे अधिकारी तहसीलदार फुल एक्शन मोळ मध्ये असुन मोठमोठे कार्यवाई करित आहेत त्यामुळे मोठमोठे कार्यवाई मुळे अवैध वाळु करनाऱ्यात भिति चे वातावरण पसरले आहे तर दुसरीकडे खेडे पाडयात रात्रन दिवस बीना रॉयल्टीचे वाळु वहातुक होत आहे अवैधवाळु व्हातुक रात्रदिवस चालु आहे  हे वाळु व्हातुक करतांना. सामान्य नागरिकांना दिसत आहे तर हे अवैद्यवाळु व्हातुक करनारे व्हाण मंडलाधिकारी तलाठी यांना का दिसत नाही असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे यांच्या डोळ्यात त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू  तर झालाता नाहीना असा प्रश्न चिन्ह  सामान्य नागरिका कळुन होत आहे नाहितर काहिअवैध वाळू माफिया सोबत यांचे काही साठ गाठ तरनाही ना असाही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेयाकडे बाळापुर महसूल विभागाचे अधिकारी यांनी या घाटावर कर्मचाऱ्यांना ना माहिती देता   स्वता येऊन कार्यवाई  व .चौकशी करावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे ,सत्य लढा रिपोर्टर काझी मेहंदी हसन हातरुण

======================================

 (दि.1 जून) बियाणे महोत्सवास प्रारंभ; 826 शेतकऱ्यांनी केली बियाणे विक्रीसाठी नोंद



अकोला,दि.31(जिमाका)- पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती बियाणे विक्री महोत्सवाचे आयोजन बुधवार दि.1 जूनपासून प्रत्येक तालुक्याच्या बाजार समितीत करण्यात आले आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांनी तयार केलेले घरगुती बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असेल तर हेच घरगुती बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे. जिल्ह्यात तब्बल 826 शेतकऱ्यांनी या महोत्सवात बियाणे विक्री करण्यासाठी नोंद केली आहे. त्यासोबतच 22 शेतकरी कंपन्याही सहभागी होणार आहेत. शुभारंभाचा कार्यक्रम अकोट येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीत होणार असून अन्य तालुक्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने उद्घाटन सोहळा होणार आहे.

शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना  आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोस्तवाचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते बुधवार दि.1 जून रोजी सायंकाळी पाच वा. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे होणार आहे. अन्य तालुक्यातील शुभारंभही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होईल. या बियाणे महोत्सवात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, या प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. मुख्य सोहळा अकोट येथे होणार असून स्थानिक पातळीवर आमदार महोदय सहभागी होतील. मुख्य सोहळ्यात अकोट येथे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या समवेत विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी,  विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन  कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक  गजानन पुंडकर यांनी केले आहे.

या नियोजनाबाबत अधिक माहिती देतांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत म्हणाले की, जिल्ह्यात अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन जनजागृती करण्यात आली. या महोत्सवात बियाणे विक्री करण्यासाठी 826 शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. तर 22 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नोंद केली आहे. त्यात अकोला येथे 113, बार्शी टाकळी येथे 150, मुर्तिजापूर येथे 92, पातुर येथे 76, बाळापूर येथे 120, तेल्हारा येथे 150, अकोट येथे 125 असे एकूण 826 शेतकरी तर जिल्ह्यात एकूण 22 शेतकरी कंपन्या अशा एकूण 848 जणांनी नोंदणी केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना बियाणे विक्रीसाठी 284 स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  या महोत्सवात सोयाबीन, तुर, उडीद, मूग,कांदा, भाजीपाला पिके इ. बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्यात आले आहे.

आता पेरणीचा हंगाम जवळ आला आहे. मान्सुनही बऱ्यापैकी जवळ आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  या महोत्सवात आपल्या जवळील बियाणे विक्री करावे व ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी ते खरेदीही करावे.

या महोत्सवात बियाणे प्रक्रिया करणे, त्यात रासायनिक व जैविक प्रक्रिया करण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिकेही दिली जाणार आहेत. विक्री करावयाचे बियाणेही उगवण क्षमता तपासूनच विक्रीसाठी आणण्यात येतील, याचे नियोजन आहे. बियाणे उगवणीचे प्रात्यक्षिकही विक्रीच्या ठिकाणी दिले जाईल,असेही डॉ. खोत यांनी सांगितले.

======================================

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अकोला दि.31(जिमाका)-  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, शैक्षणीक गुणवत्‍ता कक्षाचे गजानन महल्ले, सूचना व प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

======================================

 सुनिल टोमे यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

अकोला,दि. 31 (जिमाका)-  जिल्हा माहिती कार्यालयातील रोनिओ ऑपरेटर श्री. सुनिल टोमे यांना आज सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी मिलींद दुसाने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प व भेट वस्तू देऊन श्री. टोमे यांच्या सपत्नीक सत्कार केला. यावेळी अकोला पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटनिस प्रमोद लाजुरकर, श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे, जेष्ठ पत्रकार अच्युतराव देशपांडे, मुकूंद देशमुख, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक सतिश बगमारे, कॅमेरामन हबीब शेख,  लेखा लिपीक वर्षा मसने, लिपीक विश्वनाथ मेरकर, शिपाई मंदार कुळकर्णी यांनी श्री. टोमे यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

श्री. टोमे हे 1982 पासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात कार्यरत आहेत. त्यांची जिल्हा माहिती कार्यालय अकोला, वाशिम व अमरावती अशी सुमारे 40 वर्षांची अखंडीत सेवा करून ते आज सेवानिवृत्त झाले आहे.

===============================

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षणाची अखंडीत परंपरा




 महाराष्ट्रातील व्यवसाय प्रशिक्षण देणारी नामांकित  अग्रणी शासकीय संस्था, स्थापना दिनांक 3 जून 1958 असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने स्थापनेपासूनच दर्जेदार व्यवसाय प्रशिक्षण देण्याची परंपरा अखंडीतपणे जोपासली आहे. संस्थेतून औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षणार्थी भारताच्या शासकीय, निमशासकीय, तथा खाजगी आस्थापनेत आपले योगदान देत असून देशाच्या औद्योगिक विकासात आपला वाटा उचलत आहेत .     भारतीय रेल्वे , भारत हेवि इलेक्ट्रिकल्स (BHEL), भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), आयुध निर्माणी, हिंदुस्तान एरोनॅटिक्स्, इ . तसेच टाटा  समूह  अशा नामांकीत संस्थांत काश्मीर  पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मुंबई पासून इटानगर पर्यंत ह्या संस्थेतून  प्रशिक्षित झालेले तरुण नोकरी करीत आहेत.  सन  1958 पासून कार्यरत असणाऱ्या संस्थेची शिस्त आणि कार्यपद्धतीचा दर्जा आजही कायम आहे.      संस्थेत एकूण 24 रोजगाराभिमुख  व्यवसाय असून त्यात 09 व्यवसाय एक वर्ष मुदतीचे आहेत तर  इतर 15 व्यवसाय दोन वर्षे मुदतीचे आहेत. व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हमखास रोजगार व स्वयंरोजगारची संधी निर्माण होते           www.dvet.gov.in   या  संकेत स्थळावर अधिकृत  सविस्तर माहिती प्रसारित  करण्यात  येते. प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. प्रवेशासाठी पात्रता  दहावी पास /नापास अशी असून गुणवत्तेच्या आधारावर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यासाठी अधिकृत घोषणा www.dvet.admission.gov.in वर दहावीच्या निकालांच्या घोषणेनंतर करण्यात येते .  संस्थेतील प्राचार्य, उपप्राचार्य ,गटनिदेशक ,निदेशक हे  नेहमीच प्रशिक्षणाचा दर्जा तसेच नवीन तंत्रज्ञानाचा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा प्रशिक्षणात अंतर्भाव करून प्रशिक्षण दर्जेदार कसे होईल यावर सतत चर्चा करून निर्णय घेत असतात. ह्या संस्थेत गटनिदेशक म्हणून कार्यरत असलेले मंगेश पुंडकर यांना त्यांनी प्रशिक्षणात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून दर्जेदार प्रशिक्षण देण्याच्या योगदानाबद्दल राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय “कौशलाचार्य’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. मंगेश पुंडकर यांचेसह इतर गटनिदेशकांचे अमूल्य मार्गदर्शन इतर शिल्पनिदेशक यांना नेहमीच मिळत असते.  संस्थेचे प्राचार्य पी. एन . जयस्वाल हे असून उपप्राचार्य एस आर ठाकरे आहेत. संस्थेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकोपयोगी कामे केली आहेत. जसे वेल्डिंगची कामे, छोटी बांधकामे ,इलेक्ट्रिक फिटिंग, सार्वजनिक इमारती ,शाळा ,ग्रामपंचायत कार्यालय यांची रंगकामे करून प्रशिक्षणार्थी यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यात व उत्तम नागरिक घडवण्यात संस्था अग्रेसर आहे. संस्थेच्या परिसरात भरपूर वृक्षारोपण करण्यात आले असून संस्था परिसर पर्यावरणपुरक  करण्यासाठी प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी यांनी श्रमदानाने योगदान दिले आहे .संस्थेत जिल्हास्तरावरील तंत्रप्रदर्शन आयोजन करण्यात येते त्यातून प्रशिक्षणार्थिंमध्ये संशोधनवृत्ती वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्यात आले आहे. औष्णिक विद्युत केंद्र ,पारस यांनी आयोजित केलेल्या तंत्र प्रदर्शनात संस्थेने  प्रथम पुरस्कार प्राप्त केला. त्यात संस्थेतील ‘टर्नर’  ह्या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी  यांनी संस्थेचे प्रतिनिधीत्व केले. राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी कौशल्य स्पर्धेमध्ये ‘मेसन’ ह्या व्यवसायाचा प्रशिक्षणार्थी अतिबउल्लाह खान राज्यात द्वितीय  क्रमांक मिळवून यशस्वी झाला. तसेच राज्य निदेशक कौशल्य स्पर्धेत संस्थेचे टर्नर व्यवसायाचे शिल्प निदेशक संदीप पिसे यांनाही राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला. क्रीडा स्पर्धांमधे देखील संस्थेतील प्रशिक्षणार्थी अव्वल आहेत.

 संस्था प्रशिक्षणार्थ्यांना  ऑन जॉब ट्रेनिंग (OJT)सारखी योजना देखील प्रभावीपणे राबवित असून त्यात प्रशिक्षणार्थ्याना प्रत्यक्ष कारखान्यात/उद्योग आस्थापनेत काम करण्याचा अनुभव येतो. कर्मचाऱ्यांची देखील प्रशासकीय प्रशिक्षणासाठी निवड करून त्यांच्यादेखील कार्यक्षमता वाढीसाठी संस्थेने विशेष लक्ष दिले आहे.   जागतिकस्तरावर आय.टी.आय.चे प्रशिक्षणार्थी यांचा दर्जा वाढीसाठी सतत प्रयत्न होत आहेत. सध्या प्रत्येक व्यवसायगटाचे अभ्यासक्रम NSQF LEVEL चे आहेत. अभ्यासक्रम शंभराहून अधिक देशांनी मान्य केला असून तरुण भारतीय तंत्रज्ञांना  जागतिकस्तरावर मोठी संधी आहे. जगभरातून कुशल तंत्रज्ञांची मोठ्या  प्रमाणात मागणी आहे; ही बाब लक्षात घेऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला प्रशिक्षणार्थ्यांची पूर्वतयारी करून घेत त्यांना  जागतिक आव्हाने पेलण्यासाठी सज्ज करीत आहे. प्राचार्य श्री पी. एन. जयसवाल यांच्या मार्गदर्शनात संस्था येणाऱ्या काळात विकासाचा नवीन पल्ला गाठणार आहे अनेक योजना आणि प्रशिक्षणात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून दर्जेदार कुशल तंत्रज्ञ तयार करून त्यांच्या दर्जेदार तुकड्या भारताच्या औद्योगिक विकासासाठी आपले योगदान देण्यासाठी सज्ज होतील.  दर्जेदार व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला. कटिबद्ध असून नवीन तंत्रज्ञानासह सज्ज आहे. संस्थेत प्रवेशासाठी www.dvet.gov.In किंवा www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर अधिकृत माहितीसाठी भेट देऊन आपले प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,अकोला यांनी केले आहे.    लेखक- शंतनु  वानखेडे,

============================

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना; शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

  अकोला,दि.31(जिमाका)- शासनाने मृग बहार २०२२ मध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे शेतकरी व कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.

या योजनेंतर्गत समाविष्ट फळपिके,  विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी  भरावयाचा  विमा हप्ता (कंसात) याप्रमाणे आहे.

संत्रा- ८० हजार रुपये (४ हजार रुपये), लिंबू-७० हजार रुपये (३५०० रुपये), मोसंबी ८० हजार रुपये (४ हजार रुपये), डाळींब-एक लाख ३० हजार रुपये (६५०० रुपये), पेरु-६० हजार रुपये (३ हजार रुपये) याप्रमाणे. अधिसूचित फळपिके व समाविष्ट महसूल मंडळ याप्रमाणे- डाळिंब- शिवणी, पेरु, मोसंबी- पातूर ता. पातूर, लिंबू- शिवणी, सांगळूद,बोरगावमंजु,कौलखेड, कापशीरोड, राजंदा, धाबा, महान,खेर्डाबु.,निम्भा, जामठी बु., कुरुम, मुर्तिजापूर, हातगाव,अकोलखेड, आसेगाव बाजार,उमरा, पणज, मुंडगाव, अकोट, अडगाव बु., हिवरखेड ता. तेल्हारा, माळेगाव बाजार,पातुर, बाभूळगाव,आलेगाव,सस्ती, चान्नी,वाडेगाव, बाळापूर, संत्रा- राजंदा, धाबा, निम्भा, कुरुम, हातगाव, अकोलखेड, उमरा, पणज अकोट, अडगाव बु.,  हिवरखेड, माळेगाव बाजार,तेल्हारा, पातुर, आलेगाव.

 अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंमलबजावणी करिता नेमणूक करण्यात आलेल्या कंपनीची माहिती याप्रमाणे- एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स क. लि., मुंबई- पत्ता व संपर्क क्रमांक- एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स क. लि.,पहिला मजला, एचडीएफसी हाऊस,१६५-१६६ एच.टी. पारेख मार्ग, चर्चगेट मुंबई -४०००२०, दूरध्वनी क्रमांक०२२-६२३४६२३४, ग्राहक सेवा क्र.-१८००२६६०७००, इमेल:- pmfby.maharashtra@hdfcergo.com    तरी शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळवण्यासाठी संत्रा, लिंबू,पेरू या फळपिकाकरिता दि.१४ जुन, डाळिंब पिकाकरिता दि.१४ जुलै, मोसंबी करिता दि.३० जून या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीकरिता तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे

=======================================

आलेगाव शेतशिवारात निर्गुणा नदिकाठी  चालू हातभट्टी लावून गावारण मोहा दारू बनवीणाऱ्या आडयावर विशेष पथकाचा छापा 2 आरोपी रंगेहाथ अटक 60 डब्ब्ये मध्येमोहा सलवा 400 लीटर, मोहा दारू  90 लीटर, इतर साहित्य   साहित्य 1 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

आलेगाव आज दि, 31,05,22 रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिलाली की आलेगाव मद्घये निर्गुणा नदिकाठी काही इसम हात्भट्टि कारखाना लावून गावारांन दारू बनवित  आहेत अशा खात्रिशिर ख़बरेवरुन पंचासमकश छापा मारला असता  तेथे अरोपि 1, शहजादखान जफरखान 25 रा आलेगाव मोमिनपुरा ,2सय्यद सालार सय्यद इस्माइल  वय 30 रा मोमिनपुरा आलेगाव,  यांच्या 2  गावारण हात्भट्टि चालविताना ते मिळून आलेत तर 3 ,4 इसम पोलिसांना पाहुन पळून गेलेत, वरील 2आरोपी  जवळून 2 चालू भट्टीवरुण वरील   प्रमानेचा मुद्देमाल जपत करून वरील आरोपी विरुद्ध पो स्टे,  चानणी येथे दारुबन्दी कायद्याच्या अनवये गुन्हे नोंदविन्यात आले आहेत, 

सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक मोनिका राउत मैडम यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल यांच्या विशेष पथकाने आलेगाव पो सटे चानणी येथे आज सकाळी 05।00 वाजता केली,

========================================

वाहनाचे सायलेन्सर बिनापरवांगीने बदलवुन फटाके फोडणा-या बुलेट वाहनावर शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे केली कायदेशीर कार्यवाही

अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणा-या भागात काही खोडकर वाहन चालकांनी मुख्यतः बुलेट वाहनात विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसवुन फटाके फोडण्याचे प्रकार अकोला शहरात वाढले आहे. ज्यामुळे अशा वाहनाव्दारे रस्त्यावर चालनारे वाहन चालक तसेच महीलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची अनेक तक्रारी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी आज दि 31/05/2022 रोजी सायलेन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता विषेश मोहीम राबवुन शहरातील रस्त्यावर फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेले वाहनांचा शोध घेवुन 07 वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. सायलेन्सरव्दारे फटाके फोडणारे बुलेट वाहन तसेच इतर वाहने ज्यामध्ये कर्णकरकश आवाज करणारे अवैध साहीत्य लावुन शहरातील नागरिकांना त्रास देणा-या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करणेकरीता सदरची  मोहीम अकोला शहरात सतत राबविण्यात येणार आहे.  करीता अकोला शहरातील सर्व वाहन चालकांना ज्यांचे वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकश आवाज करणारे हाॅर्न लावण्यात आलेले आहे अशा वाहन चालकांना पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन आवाहन करण्यात येते की अशा वाहनांचे सायलेन्सर व हाॅर्न शासन नियमांनुसारच लावावे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने