महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर, नव्या आरक्षणामुळे दिग्गजांना फटका
अकोला : आरक्षणामुळे 25 हून अधिक विद्यमान नगरसेवकांना निवडणुक रिंगणाबाहेर राहावं लागणार आहे. अकोला महापालिकेत एकू़ण 91 जागा असून एकूण 46 जागा महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 15 जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उच्च न्यायालयाने इतर मागास वर्गाचे आरक्षण नाकारल्याने एकूण ७४ जागांवर खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. एकुण ९१ जागांमधील ४६ जागा महिला प्रवर्गाकरिता आरक्षित करतांना ८ जागा अनुसुचित जाती महिला आणि एक जागा अनुसूचित जमाती महिलासाठी जाहिर झाली. तर उर्वरित ३७ जागा सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी जाहिर झाल्या. दरम्यांन, महापालिकेच्या एकूण ३० प्रभागातून ९१ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. २९ प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अकोला महापालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण (Akola Election Reservation 2022) आज जाहीर झालं. आजच्या नव्या आरक्षणामूळे दिग्गजांना फटका बसला असून अकोल्याचे भाजप उपमहापौर राजेंद्र गिरी यांचे प्रभाग आरक्षित निश्चित झाले. तर भाजपचे सभागृह नेते राहूल देशमुखांचा प्रभाग महिलेसाठी राखीव झाले. या आरक्षणामूळे २५ वर विद्यमान नगरसेवकांना निवडणूकक रिंगणाबाहेर राहावे लागणार आहे. अकोला महापालिकेत एकू़ण ९१ जागा असून एकूण ४६ जागा महिलांसाठी राखीव आहे. तर १५ जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव आहे.
अनुसुचित जाती माहिलांसाठी आरक्षित जागा
अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने एकूण १५ प्रभागातील अनुसुचित उमेदवाराकरीता आज चिठ्ठया टाकून आरक्षण सोडत जाहिर झालं. यामध्ये सात जागा अनुसूचित जाती महिला राखीव झाले. ज्यात ३-अ, ६-अ, ९-अ, १०-अ, १२-अ, १८-अ, १९-अ, आणि २३-अ जागा आहे.
अनुसूचित जमातीसाठी '२४-अ' हि जागा महिला राखीव करण्यात आलीय
सर्वसाधारण महिलांसाठी असे आहेत आरक्षित जागा
सर्वसाधारण महिलांसाठी ३७ जागा राखीव झाल्या. ज्यामध्ये १-अ, ५-अ, ७-अ, ८-अ, ११-अ, १३-अ, १५-अ, १६-अ, १७-अ, २१-अ, २२-अ, २६-अ, २८-अ, तर 'ब' जागांसाठी २-ब, ३-ब, ४-ब, ६-ब, ९-ब, १०-ब, १२-ब, १४-ब, १८-ब, १९-ब, २०-ब, २३-ब, २४-ब, २५-ब, २७-ब, २९-ब, ३०-ब या ३० जागा आरक्षित झाल्या होत्या.
तर उर्वरित ७ जागा 'ज्या' प्रभागात २ जागा अनारक्षित आहे. त्या प्रभागातून चिठ्ठया टाकून आरक्षित केल्या आहे. ज्यामध्ये १-ब, ५-ब, ८-ब, १५-ब, १७-ब, २६-ब, २८-ब हे जागा सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. असे एकत्रित ३७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आले.
==================================
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती संपन्न राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त भव्य रथ यात्रा संपन्न
अकोला/ ३१ मे : जय मल्हार प्रतिष्ठान, धनगर समाज महासंघ, मल्हारसेना, अहिल्या महिला संघ, धनगर समाज संघर्ष समिती यांच्या वतीने आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त श्रीराम मार्केट, डाबकी रोड, अकोला येथे जयंती कार्यक्रम संपन्न झाला. विश्वयोद्धा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शहरातुन भव्य रथयात्रा व बाईक रॅली काढण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ समाज सेवक श्री भास्करराव पिलात्रे तर स्वागताध्यक्ष श्री रमेशराव उभे गुरुजी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. गटनेता श्री ज्ञानेश्वरभाऊ सुलताने, माजी महापौर सौ सुमनताई गावंडे, मल्हारसेना प्रमुख श्री जगतपालजी कोगदे, मल्हार प्रतिष्ठानचे सचिनभाऊ नागे, चंद्रकांतभाऊ घटाळे, हभप प्रल्हाद महाराज कळंब उपस्थित होते.
यावेळी दिपप्रज्वलन करून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अतुल पिलात्रे यांनी तर आभार प्रदर्शन श्री सतीश उभे यांनी केले.
या कार्यक्रमाला सर्वश्री श्री नरहरी बोरसे, गजाननराव काळदाते, चीनकाजी गिल्ले, लक्ष्मीनारायणजी ठाकूर, नामदेवराव कवाडकर, किशोर घोंगे, गोपाल लांभाडे, अमेय पुंडे, विनोद बरिंगे, गणेशराव कोगदे, खंडूजी लाखे, शंकरराव डांगे, काशीरामजी घोंगे, गजाननराव गावंडे, वासुदेवभाऊ बाजोड, मल्हार प्रतिष्ठानचे प्रवीणभाऊ गव्हाळे, संदीपभाऊ काळदाते, रामकृष्ण कवरकार, चेतन साबे, अमोल साबळे, पवन जुमळे, भूषण सोनाग्रे, वैभव घोंगे, अक्षय घोंगे, सागर मोरे, महेश मोरे, विश्राम गावंडे, शिवा वैतकार, संजय नागे, अजय वैतकार, सौ रेखाताई डांगे, प्रतिभाताई अवचार माजी जि प सदस्य, सौ महानंदाताई पिलात्रे, सौ संगीताताई नवलकर, प्रा मंतोष मोहोड, सौ घटाळे ताई, सुशीलाताई कोगदे, सौ गाडगे ताई, रुपाली उभे, बरिंगे ताई, बाजोडताई, श्री संतोष लाखे, संतोष घाटोळे, नारायण कात्रे, श्री विशाल साबळे, रामदास तांबडे, गजानन तांबडे, शुभमभाऊ मोरे, रोशन साबळे, चेतन भिसे, धीरज साबळे, शुभम बोरसे, महेश अघडते, जय दडस, चेतन आघाडते, ज्ञानेश्वर गाडगे, रामचंद्र गाडगे, रवी नागे, वैभव गावंडे, अनिकेत पातोंड, अक्षय गावंडे, तुषार कवडकार, वैभव करस्कार, प्रतीक जुमळे, हृषीकेश जुमळे, शिवराज सपकाळ, दत्ता कोगदे, अनिकेत कोगदे, ज्ञानेश्वर गाडगे, ओम साबळे, विशाल बोन्द्रे, हरीश सांबळे, अजय घोडस्कर, पवन गावंडे, सागर गावंडे, आकाश गावंडे, आदित्य घाटोळे, पवन घाटोळे, धीरज जुमळे, मुन्ना मोरे , चेतन अगडते, निलेश गाडगे, रवी जुमळे, गणेश जुमळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिक, महिला व युवक उपस्थित होते.
या प्रसंगी आयोजित भव्य रथयात्रेचा शुभारंभ डाबकी रोड येथून करून समारोप राष्ट्रीय महामार्ग येथील मल्हार प्रतिष्ठान चे कार्यालय येथे करण्यात आला, या रथयात्रेमध्ये समाजातील प्रतिष्ठित मान्यवर युवक वर्ग, माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
===============================
विशेष पथकाचा छापा 3 आरोपी रंगेहाथ अटक डब्ब्ये मध्ये मोहमाच,मोहा दारू , इतर साहित्य साहित्य 55,200 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
पातूर नंदापूर शेतशिवारात, निरगुळा नदिकाठी चालू हातभट्टी लावून गावारण मोहा दारू बनवीणाऱ्या आडयावर तर राहते घरी हातभट्टी लावून गावरान मोहा दारू बनविणाऱ्या वर विशेष पथकाचा छापा 3 आरोपी रंगेहाथ अटक डब्ब्ये मध्ये मोहमाच,मोहा दारू , इतर साहित्य साहित्य 55,200 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
आज दि, 1-06-22 रोजी मा. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की पातूर नंदापूर मधे निरगुळा नदिकाठी काही इसम हातभट्टी कारखाना लावून गावारांन दारू बनवित आहेत अशा खात्रिशिर ख़बरेवरुन पंचासमक्ष छापा मारला असता तेथे आरोपी भगवान उत्तम भगत वय 37 रा. पातूर नंदापूर गावारण हातभट्टी चालवितांना मिळून आला.तेथे टपरी पिपे त्यात हातभट्टी ने काढलेली दारू 25 लिटर ,मोहमाच 135 ली.ने भरलेले पिपे,चालू भट्टीवरुण असा एकूण 15,800रु. चा मुद्देमाल जप्त करून वरील आरोपी विरुद्ध पो स्टे,पिंजर येथे दारुबन्दी कायद्याच्या अनवये गुन्हे नोंदविन्यात आले आहे.
तसेच पेट्रोलिंग दरम्यान पातूर नंदापूर येथील बौद्ध पुरा येथे राहणारा प्रीतम राजेंद्र चक्रनारायण हा राहत्या घरात हातभट्टी लावून गावरान दारू काढत आहे...अश्या खात्रीलायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून रेड केली असता सदर इसम त्याच्या राहत्या घरात हातभट्टी लावून गावरान दारू काढतांना मिळून आला.त्याच्या कडे 22 डब्बे मोहमाच चा सडवा, गावरान दारू 50 लिटर असा एकूण 31,400 रु. चा मुद्देमाल मिळून आला .त्याचे हे कृत्य महा. दा. अधी. अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन पातूर नंदापूर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे...
तसेच पेट्रोलिंग दरम्यान पातूर नंदापूर येथील बौद्ध पुरा येथे राहणारा बाळकृष्ण खंडारे हा राहत्या घरात हातभट्टी लावून गावरान दारू काढत आहे...अश्या खात्रीलायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून रेड केली असता सदर इसम त्याच्या राहत्या घरात हातभट्टी लावून गावरान दारू काढतांना मिळून आला.त्याच्या कडे 5 डब्बे मोहमाच सडवा,20 लिटर गावठी दारू असा एकूण 8000 रु चा मुद्देमाल मिळून आला .त्याचे हे कृत्य महा. दा. अधी. अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन पातूर नंदापूर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे...
================================
जागतिक तंबाखू विरोधी दिन
जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अकोला व जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यलय अकोला यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनांक ३१ मे २०२२ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधीकरण येथील सभागृह मध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन निमीत्त कार्यक्रम घेण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष के .बी. चौगुले, प्रभारी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अकोला, प्रमुख पाहुणे डॉ. अमोल केळकर, मानसरोग तज्ञ , डॉ . मिना शिवाल, वैद्यकीय अधिकारी, डॉ . प्रिती कोगदे, सल्लागार,राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम अकोला, श्री धम्मसेन शिरसाट, जिल्हा समुपदेशक, अधिक्षक डि .पी. बाळे, लिपीक कुणाल पांडे , शिपाई शाहबाज खान,पॅनल वरील विधीज्ञ मंडळी, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विधी स्वयम सेवक इत्यादी उपस्थीत होते. यावेळी उपस्थीत मान्यवरांनी आपले तंबाखु विरोधी मार्गदर्शन व्यक्त केले. यावेळी डॉ . अमोल केळकर यांनी तंबाखु कशा प्रकारे सोडावे त्याबद्दल माहीती दिली. तसेच डॉ प्रिया कोगदे, डॉ . मिना शिवाल, श्री धम्मसेन शिरसाट यांनी आपले तंबाखु विरोधी मार्गदर्शन व्यक्त केले. सुत्रसंचालन अॅड कांचन शिंदे , महीला उपाध्यक्ष अकोला बार, तसेच आभार प्रदर्शन अधिक्षक डि .पी. बाळे यांनी केले.
टिप जागतिक तंबाखू विरोधी दिन* निमीत्त कार्यक्रम जिल्हा न्यायालय येथील मुख्यालय तसेच तालुका न्यायालय येथे संपन्न झाला.
.jpeg)

