मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी कारवाई .

 मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी कारवाई . 

अकोला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या आढावा बैठक घेण्यात आली होतीत्या आढावा बैठकीत काही कामचुकार ग्रामसेवकांना विकासात्मक कामेन केल्यामुळे व कामात दिरंगाई केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी ही केली मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या दोन तीन वर्षाच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कारवाई असल्याची चर्चा जिल्हा परिषद मध्ये होत आहे, या ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत चा टॅक्स वसूल 15 वित्त आयोगाचे  कामन करणे व आढावा बैठकीत याची माहिती नदेणे वरिष्ठांच्या आदेशाचीअवहेलना करणे याप्रमुख कारणांमुळे जिल्ह्यातील सहा ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यामध्ये ग्रामसेवक पकज धोपे पंचायत समिती अकोला. मनोज पिंपळकर .उडाळपंचायत समिती पातुर.

मनीषा देशमुख पंचायत समिती तेल्हारा. हेमंत सोनोने पंचायत समिती मूर्तिजापूर. आर एन पाटे खेडे पंचायत समिती बार्शी टाकळी, यांना निलंबित करण्यात आले असून एका कंत्राटी ग्रामसेवक आला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे

विशेष म्हणजे गेल्या दोन दिवस आधीच अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील ग्रामसेवक रवि कासदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांचा एक ते चार चौकशी अहवाल व अफरातफर केलेल्या पैशाची वसुली सरपंच व सचिव यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत,

आज दिवसभर अकोला जिल्हा परिषदेच्या आवारात फेरफटका मारला असता नऊ ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची फाईल मुख्य कार्यकारीअधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सादर करण्यात आली होती परंतु त्यातील सातच ग्रामसेवकांवर कारवाई झाल्याने त्यातील ते दोन ग्रामसेवक कोण? असा प्रश्न जिल्हा परिषद मध्ये  चर्चेचा विषय झाला  आहे,त्या दोन ग्रामसेवकांवर कारवाई न झाल्यामुळे त्यामध्ये अर्थ कारण आहे की राजकारण की दबाव कारण हे समजण्या पलीकडे  असल्याची चर्चा जिल्हा परिषद मध्ये होत आहे, त्या दोन ग्रामसेवकांचे नाव मुख्य कार्यकारी अधिकारी घोषित करतात की त्यांना सोडून देतात अशी चर्चा जिल्हा परिषद मध्ये होत आहे,

======================================

अकोला शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन

अकोला शहर हे उष्ण शहर म्हणून प्रसिद्ध आहे, त्यात या वर्षी तापमान 45 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचल्याने नागरिकांना हैरान झाले होते... या वर्षी जास्त ऊन असल्याने पावसाचे आगमन ही लवकर होण्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तविले होते... जे खरे ठरले असून आज 1 जून रोजी पावसाने अकोला शहरात आपली हजेरी लावली.. अकोल्या शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने वातावरणात थोड्या प्रमाणात का होईना गारवा निर्माण झालाय..., आज पडलेल्या पावसामुळे शहरातील  तापमानात घट झाल्याचे दिसून आले.. पावसाची सुरवात झाल्याने लहान पासूनमोठ्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर रील आनंद सहज बघायला ..तर दुसरीकडे  प्राप्तमाहितीनुसार शहराला लागून असलेल्या काही  गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे फार मोठे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त होत आहे...

======================================

 ब्रेकींग...... दर्यापुर येथे  वादळी वा-यासह गारपीट होऊन अर्धा तास जोरदार पाऊस.  

अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये दर्यापूर येथील मुर्तीजापुर रोडवरील वैभव मंगल कार्यालयाचे संपुर्ण शेड उडुन कोसळल्याची माहिती प्राप्त होत आहेया मध्ये काही महीलां व बालकांचा तसेच नागरिक किरकोळ जखमी झाले.सुदैवाने जीवितहानी नाही. अशी माहिती प्राप्त होत आहे,

======================================

बियाणे महोत्सव 'क्रांती'ची सुरुवात पालकमंत्री बच्चू कडू यांचे प्रतिपादन पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद;९१२ क्विंटल बियाण्याची विक्री


अकोला,दि.१(जिमाका)- शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उन्नती साधता यावी, त्यांची फसवणूक व शोषण टाळता यावे, यासाठी बियाणे महोत्सव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने बियाणे महोत्सव एका अर्थाने 'क्रांती'ची सुरुवात आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज अकोट येथे केले.

शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना  आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी बियाणे महोत्सवाचे आयोजन दि.१ ते ६ या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते आज अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडला. अन्य तालुक्यातील शुभारंभही याचवेळी  व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे करण्यात आला.

अकोट येथील मुख्य सोहळ्यास विधान परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, अकोट बाजार समितीचे मुख्य  प्रशासक गजानन पुंडकर,कृषी उपसंचालक मनोहर मुंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल  चिंचोले, तहसीलदार निलेश मडके, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिंदे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.खोत म्हणाले की, या महोत्सवात पहिल्याच दिवशी २२०० क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून ९१२ क्विंटल बियाणे विक्री झाले आहे.

आपल्या मनोगतात आ.अमोल मिटकरी म्हणाले की, बियाणे महोत्सव हा शेतकऱ्यांना सन्मान देणारा उपक्रम आहे. असाच सन्मान शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता,आजचा हा उपक्रम त्याचीच आठवण करून देतो. शेतकऱ्यांना सर्व प्रकारचा पीक पेरा करता यावा यासाठी वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना व्हाव्या,अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी या महोत्सवा विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

आपल्या भाषणात पालकमंत्री कडू म्हणाले की, बियाणे महोत्सवासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी हिम्मत करावी लागते. शेतकरीबियाणे महोत्सव 'क्रांती'ची सुरुवात पालकमंत्री बच्चू कडू यांचे प्रतिपादन

=========================================

मनपा दक्षिण झोन अंतर्गत शिवनी भागातील अतिक्रमणावर निष्‍कासनाची कारवाई.  

अकोला दि. 1 जून 2022  –   आज दि. 1 जून रोजी मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिका दक्षिण झोन अंतर्गत शिवनी येथील नाले सफाईच्‍या कामामध्‍ये अडथळे निर्माण करणारे तसेच वाहतुकीत अडचण निर्माण करणा-या दुकानाचे, पान टपरी, चहा टपरी व ईतर अतिक्रमणावर मनपा दक्षिण झोन कार्यालय आणि अतिक्रमण विभागाव्‍दारे निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली आहे.  

          सदर कारवाई सहा.आयुक्‍त अतिक्रमण जगदीश देशमुख यांच्‍या मार्गदर्शनात झाली असून कारवाईत दक्षिण झोन क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे, सहा.कर अधिक्षक प्रशांत बोळे, आरोग्‍य निरीक्षक आदर्श गोराने, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, योगेश कंचनपुरे, जीवन मानकीकर, संतोष भगत, सैय्यद रफीक, रूपेश इंगळे, वैभव कवाळे आदींचा समावेश होता.

=========================================

पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद;९१२ क्विंटल बियाण्याची विक्री

अकोला,दि.१(जिमाका)- शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उन्नती साधता यावी, त्यांची फसवणूक व शोषण टाळता यावे, यासाठी बियाणे महोत्सव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने बियाणे महोत्सव एका अर्थाने 'क्रांती'ची सुरुवात आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज अकोट येथे केले.

शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना  आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी बियाणे महोत्सवाचे आयोजन दि.१ ते ६ या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते आज अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडला. अन्य तालुक्यातील शुभारंभही याचवेळी  व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे करण्यात आला.

अकोट येथील मुख्य सोहळ्यास विधान परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, अकोट बाजार समितीचे मुख्य  प्रशासक गजानन पुंडकर,कृषी उपसंचालक मनोहर मुंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल  चिंचोले, तहसीलदार निलेश मडके, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिंदे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.खोत म्हणाले की, या महोत्सवात पहिल्याच दिवशी २२०० क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून ९१२ क्विंटल बियाणे विक्री झाले आहे.

आपल्या मनोगतात आ.अमोल मिटकरी म्हणाले की, बियाणे महोत्सव हा शेतकऱ्यांना सन्मान देणारा उपक्रम आहे. असाच सन्मान शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता,आजचा हा उपक्रम त्याचीच आठवण करून देतो. शेतकऱ्यांना सर्व प्रकारचा पीक पेरा करता यावा यासाठी वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना व्हाव्या,अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी या महोत्सवा विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

आपल्या भाषणात पालकमंत्री कडू म्हणाले की, बियाणे महोत्सवासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी हिम्मत करावी लागते. शेतकरी शेतकऱ्यांना बियाणे विकत देईल. शेतकरी हा शेतकऱ्याची फसवणूक करणार नाही.  विविध बियाणे उत्पादक कंपन्या अव्वाच्या सव्वा दराने बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात.ही शेतकऱ्याची एक प्रकारची लूट आहे. मात्र केवळ अशी ओरड करून चालणार नाही, त्यासाठी बियाणे महोत्सवाची कल्पना ही एक उत्तम पर्याय आहे. या उपक्रमामुळे किमान ५ ते ६ कोटी रुपयांची बचत शेतकऱ्यांना होईल, त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. त्यादृष्टीने पाहिल्यास बियाणे महोत्सव हे एक क्रांतीची सुरुवात आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे आले पाहिजे,असे आवाहनही त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. शेतकरी हा एक संशोधक आहे, हे ही या उपक्रमातून दिसून आले आहे. या उपक्रमाचा पुढचा टप्पा शेतकऱ्यांना खते, फवारणीची औषधें उपलब्ध करून देणे हा असेल,असेही त्यांनी सांगितले.

          कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.खोत यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

======================================

उत्कृष्ट कोळसा व्यवस्थापन - संचलन कार्यप्रणालीच्या माध्यमातून महानिर्मितीची विक्रमी कामगिरी

 


(दि. १ जून २०२२, नागपूर) : आव्हानात्मक परिस्थितीत गेल्या सुमारे ३ महिन्यांपासून अतिशय सातत्याने उच्चतम विक्रमी कामगिरी नोंदविणाऱ्या महानिर्मितीने नुकतेच वीजनिर्मितीत आणखी काही नवे उच्चांक नोंदविले आहेत.  मे २०२२ मध्ये महानिर्मितीने उच्चतम कामगिरीद्वारे ५१८२.४६३ दशलक्ष युनिट्स औष्णिक वीजनिर्मितीसह एकूण ५९८६.९१ दशलक्ष युनिट्स इतकी मासिक वीजनिर्मिती साध्य केली आहे.  यापूर्वीची सर्वोच्च कामगिरी मार्च २०२१ मध्ये ५००३ दशलक्ष युनिट्स मासिक औष्णिक वीजनिर्मिती व एप्रिल २०२२  मध्ये एकूण ५९४८ दशलक्ष युनिट्स इतकी मासिक वीजनिर्मिती अशी होती. 

तसेच महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राने टप्पा क्र. ३ (३ x ६६० मेगावॅट) संचांमधून मे २०२२ मध्ये ११९२.३४३ दशलक्ष युनिट्स इतकी मासिक वीजनिर्मिती साध्य करीत आजवरची विक्रमी कामगिरी केली आहे.  वीजनिर्मितीमध्ये सातत्य राखत असताना कोराडी औष्णिक विद्युत केंद्राने ८०.९४% भारांक नोंदविला आहे.  यापूर्वीची कोराडी विद्युत केंद्राची महत्तम कामगिरी मार्च २०२२ मध्ये ११५८.८१३ दशलक्ष युनिट्स इतकी मासिक वीजनिर्मिती व ७८.६६% भारांक अशी होती.  

देशभरातील कोळसा टंचाईच्या परिस्थितीतही उच्चतम कार्यक्षमता राखत महानिर्मितीने लक्षणीय वीजनिर्मिती साध्य केलेली आहे.  देखभाल-दुरुस्तीच्या काटेकोर व्यवस्थापनाचे पालन करून औष्णिक संचांची उपलब्धता १००% असावी, यासाठी महानिर्मिती सतत प्रयत्नशील आहे.  महानिर्मितीचे बहुतांशी औष्णिक संच वीजनिर्मितीसाठी उपलब्ध असल्याने त्या प्रमाणात या संचांना पुरेसा कोळसा उपलब्ध करून देणे हे आव्हान महानिर्मितीच्या इंधन व्यवस्थापन कक्षाने देखील समर्थपणे पेलले असून मे महिन्यात त्यासंदर्भात काही विक्रम देखील साध्य केले आहेत.  महानिर्मितीच्या इंधन व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून मे महिन्यामध्ये विक्रमी ४१,७३,८८३ मेट्रिक टन इतका मासिक कोळसा उपलब्ध करण्यात यश मिळविले असून या काळात एकूण ९३६ कोळसा रेक्सद्वारे प्रतिदिन सरासरी सुमारे ३०.१९ रेक्स कोळसा उपलब्ध झाला आहे.  महानिर्मितीच्या आजवरच्या इतिहासात महिनानिहाय प्राप्त एकूण कोळसा रेक्स, त्यायोगे प्राप्त प्रतिदिन सरासरी कोळसा रेक्सचे प्रमाण व एकूणच कोळशाची मासिक उपलब्धता या तीनही बाबींमध्ये आजवरची ही सर्वोच्च कामगिरी आहे. 

  कोराडी औष्णिक विद्युत केंद्रासहित एकूणच महानिर्मितीच्या या विक्रमी वीजनिर्मितीबाबत तसेच उत्कृष्ट कोळसा व्यवस्थापनाबाबत मा. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय खंदारे, संचालक (संचलन) श्री. चंद्रकांत थोटवे तसेच संचालक (माईनिंग) श्री. पुरुषोत्तम जाधव व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

====================================

बार्शिटाकळी तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु


  अकोला,दि.1(जिमाका)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाअतंर्गत बार्शिटाकळी तालुक्यातील  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे.  या शासकीय वसतीगृहात आठवी ते बी.ए. भाग-1 च्या विद्यार्थ्यांना विनामुल्य सोईसुविधा पुरविल्या जाणार आहे. प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन बार्शिटाकळी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल के. एम. तिडके यांनी केले आहे.

            वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून सर्व सोईसुविधा विनामुल्य राहिल. त्यात सकाळी नास्ता, दुध, फळ किंवा अंडे देण्यात  येईल. जेवनामध्ये वरण, भात, पोळी, सलाद, पापड,  तुप, तसेच आठवड्यातुन दोन दिवस मासाहार जेवन दिल्या जाईल. शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सोईसुविधामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा, महाविद्यालयात असलेल्या गणवेश वसतीगृहामार्फत पुरविण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता, स्टेशनरी भत्ता व रेनकोट भत्ता देण्यात येईल. वसतीगृहात प्रवेशीत विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता वेगळी अभ्यासिका आहे. तसेच त्यांना संगणक हाताळणी, ई-लायब्ररी इ. सुविधा दिल्या जातात. वसतीगृहात प्रवेश प्रवर्गानुसार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अंपग व अनाथ याप्रमाणे दिल्या जाईल.

====================================

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत विविध योजनेचा लाभ एका छताखाली


 अकोला,दि.1(जिमाका)- महिला व बालविकास विभागातर्गंत एकात्मीक बालविकास प्रकल्प व तहसील कार्यालय बाळापुर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी(दि.30) नगरपरीषद बाळापुर  येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात कोरोना मुळे विधवा झालेल्या महिलांना मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ एका छताखाली देण्यात आली.

            कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलानां विविध योजनेचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा याकरीता ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मिशन वात्सल्य समितीचे गठन करण्यात आले. या समितीत तहसीलदार अध्यक्ष असुन बालविकास  प्रकल्प अधिकारी हे सदस्य सचिव तर 13 विभागाचे अधिकारी या समितीमध्ये सदस्य आहेत. शासनाच्या 24 प्रकारच्या योजनाचा समावेश  मिशन वात्सल्य अंतर्गत करण्यात आले आहे. बाळापूर येथील मेळाव्यात बालसंगोपन योजनेचे 22, संजय गांधी निराधार योजनेचे 24 व राशन कार्डचे 17 प्रस्ताव स्विकारण्यात आले. तर दोन अर्जदारांना मेळाव्यामध्येच राशनकार्ड वितरीत करण्यात आले. शिबीरामध्ये सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना विविध विभागांच्या प्रतिनींधींनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेबाबत माहीती दिली. या शिबीरामध्ये बाळापुरचे तहसीलदार सैयद अयसानोदीन, बालविकास प्रकल्प अधिकारी भारती लांडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे अश्विन डाबेराव, विस्तार अधिकारी गौतम बडगे, पुरवठा विभागाचे सुनिता वाघमारे, वंदना मेहसरे, दिपाली इंगोले, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे नितीन अहीर, योगेंद्र खंडारे आदि उपस्थित होते.

=====================================

अकोट येथे आरोग्य तपासणी शिबीर; 865 रुग्णांनी घेतला लाभ



  अकोला,दि.1(जिमाका)-  जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त विद्यमाने व पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून महिलांचे मोफत आरोग्य तपासणी व उपचाराकरीता तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज(दि.1) अकोट ग्रामिण रुग्णालय येथे आरोग्य तपासणी शिबीरात 865 महिला रुग्णांचे 1 हजार 823 विविध आजरांची तपासणी करुन चाचण्या करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदचे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी दिली.

आरोग्य तपासणी शिबीरास महिलांना गावांतून आरोग्य यंत्रणेमार्फत प्राथमिक तपासणी करुन तालुकास्तरावरील उपजिल्हा रुग्णालयापर्यंत आणण्यात आले. येथे त्यांची सर्व तज्ज्ञांमार्फत तपासणी, निदान व अनुषंगिक उपचार करण्यात आले. या शिबिरात स्त्रियांचे विविध आजार, कर्करोग, रक्ताचे विकार, त्वचा विकार, किडनीचे आजार, हाडांचे विकार, दातांचे विकार या सह विविध आजारांवर उपचार करण्यात आले. त्यात 865 महिलांचे 1823 विविध आजारांची तपासणी करुन 30 रुग्णांची मोठया शस्त्रक्रिया व 81 रुग्णांची लहान शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. या महिला रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतील.

आरोग्य तपासणी शिबीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमती तरंगतुषार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी  नोडल अधिकारी डॉ.मिना शिवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमणकर, डॉ.मनीष शर्मा, गटविकास अधिकारी किशोरजी शिंदे, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मिनल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्वेता सालफळे, जिल्हा लसीकरण पर्यवेक्षक डा. मंगेश दातीर, दंत शल्य चिकित्सक डॉ.अनिल कापसे, डॉ.रुपाली गुजर, डॉ.आनंद परस्कार व ग्रामीण रुग्णालयाचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी आदि उपस्थित होते. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा क्रिएटीव्ह ग्रुपचे संचालिका रेखा चांडक यांच्यातर्फे महिला रुग्णांना जेवणाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय अकोट, नागरी आरोग्य केंद्र नंदिपेठ, औषण निर्माण अधिकारी, परिचारिका आदिनी शिबीराकरीता परिश्रम घेतले.

=====================================

विशेष पथकाची जुगार खेळणाऱ्यावर  धाड. 

  बार्शीटाकळी 1/6/22 रोजी  पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदार कडुन खात्रीलायक बातमी मिळाली कि बार्शीटाकळी बस स्टेशन मागे काही इसम पैश्याच्या हारजीत वर वरली मटका जुगार  खेळत आहे अश्या खात्री लायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहाणी करून रेड केली असता तेथे 1)शिवलाल सीताराम सिरसाट 55 रा. इंदिरा आवास बा. ता.(2)दिनेश प्रल्हाद समरीतकर 49 रा. कौलखेड अकोला (3)सचिन भिकाजी मांजरे 36 रा. महसूल कॉलनी बा. टा.हे मिळून आले. त्याच्याकडे वरली मटका साहित्य दोन मो. फोन 2000रु ,नगदी 16700 रु.एक मो. सायकल 30,000असा  एकूण 48,700 रु. चा मुद्देमाल मिळून आला ..त्यांचे हे कृत्य महा. जु. का.अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन बार्शी टाकळी येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

           *सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक .. जी श्रीधर साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख श्री विलास पाटील साहेब यांनी व त्यांचे पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने