मनपा व्‍दारा वसीम चौधरी च्या इक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हब वर सीलची कारवाई.

 मनपा व्‍दारा वसीम चौधरी च्या इक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हब वर सीलची कारवाई.      



अकोला दि. 2 जून 2022  –   पुर्व झोन अंतर्गत तोष्‍णीवाल ले-आऊट येथे चौधरी कोचींग क्‍लास नावाचा कोचींग क्‍लासेसचा व्‍यवसाय असून या व्‍यवसायाच्‍या आड मध्‍ये एका अल्‍पवयीन विद्यार्थींनीस अश्‍लील मॅसेज पाठविणे, विनय भंग करणे ई.कारणास्‍तवर चौधरी कोचींग क्‍लासेसचे संचालक शेख वसीम शेख जमील यांचे विरूध्‍द पॉस्‍को कायद्यांतर्गत गुन्‍हा दाखल झालेला आहे. सदर कृत्‍यामुळे चौधरी कोचींग क्‍लासेस मध्‍ये शिकणारे मुला मुलीचे पालकांमध्‍ये दहशत पसरून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विद्यार्थी व विद्यार्थींनीकरिता तोष्‍णीवाल ले-आऊट येथे ईक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हब या नावाने लायब्ररी असून सदर लायब्ररीचे सन 2022-23 चे महानगरपालिकेचे टॅक्‍स पावतीवर सदर लायब्ररीचे मालक 1) शेख वसीम शेख जमील, 2) शेख नाझीम शेख जमील, 3) शेख तनजीम शेख जमील असे नांव नमूद असल्‍याचे पोलीस तपासात निष्‍पन्‍न झाले आहे. तसेच पिडीत विद्यार्थी सोबत घडलेल्‍या प्रकाराचे ठिकाण कोचींग क्‍लास व लायब्ररी हे असल्‍याचे त्‍यांच्‍या तपासात आढळून आले आहे.

 त्‍या अनुषंगाने आज दि. 2 जून रोजी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या  आदेशान्‍वये त्‍यांचा मनपा व्‍यवसाय परावाना रद्द करून सदर ईक्‍वीनॉक्‍स स्‍टडी हब वर मनपा पुर्व झोन कार्यालय आणि बाजार/परवाना विभागाव्‍दारे सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली आहे.

  या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, सिव्‍हील लाईन पोलीस स्‍टेशनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, पोलीस उप निरीक्षक प्रभाकर खोंड, सहा.कर अधिक्षक देवेंद्र भोजने, कनिष्‍ठ अभियंता नरेश कोपेकर, तुषार जाने, कृष्‍णा वाकोडे, दिपराज महल्‍ले, दादाराव सदांशिव, बाजार विभागाचे गौरव श्रीवास, रवि निवाने, संजय पाचपोर, निखील लोटे, सुरेंद्र जाधव तसेच पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.

===============================

मनपा दक्षिण झोन अंतर्गत शिवनी भागातील अतिक्रमणावर निष्‍कासनाची कारवाई.      



अकोला दि. 2 जून 2022  –   आज दि. 2 जून रोजी मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिका उत्‍तर झोन अंतर्गत माशुमशाह दरगाह ते लक्‍कडगंज मालीपुरा चौकापर्यंतचे नाले सफाईच्‍या कामामध्‍ये अडथळे निर्माण करणारे अतिक्रमणावर निष्‍‍कासनाची कारवाई करून नाले सफाई करण्‍यात आली.  

          सदर कारवाई सहा.आयुक्‍त अतिक्रमण जगदीश देशमुख यांच्‍या मार्गदर्शनात झाली असून कारवाईत उत्‍तर झोन क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, सहा.अतिक्रमण अधिकारी हेमंत शेळवणे, आरोग्‍य निरीक्षक मो.अलीम, अब्‍दुल सलीम, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, योगेश कंचनपुरे, जीवन मानकीकर, संतोष भगत, सैय्यद रफीक, रूपेश इंगळे, वैभव कवाळे आदींचा समावेश होता.

================================

जय बजरंग व्यायाम शाळेचा उपक्रम  धनुर्विद्या मल्लखांब प्रशिक्षण शिबिराचा समारोप.




वाडेगाव  येथे आयोजित करण्यात आलेल्या धनुर्विद्या तसेच मल्लखांब प्रशिक्षण शिबिराचा समारोप संपन्न झाला.  जय बजरंग व्यायाम शाळेचे संस्थापक माजी आमदार प्रा  तुकाराम बिडकर यांचे मार्गदर्शनाखाली  स्थानिक जय बजरंग व्यायाम शाळा चे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिनांक 1 मे ते 1 जुन या  कालावधी मध्ये सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या  शिबिरा मध्ये शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते  शिबिराच्या समारोपीय कार्यक्रम गजानन इंगळे यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ हिंमतराव घाटोळ, राठोड मॅडम, विद्यमान पंचायत समिती सदस्या सौ रुपालीताई काळे, माजी पंचायत समिती सदस्य बब्बू भाई ठेकेदार, माजी उपसरपंच बळीराम घाटोळ,  डॉ कृष्णराव भुस्कुटे, डॉ राजेश चिंचोळकर, प्रा नितीन मानकर शामलाल लोध सह अनंता काळे यांच्या  प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.  याप्रसंगी  विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित होण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी एक लाख रुपयांची देणगी देण्याचे आपल्या मनोगतातुन जाहीर केले.  त्यावेळी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांच्या समोर धनुर्विद्या,  मल्लखांब तसेच ईतर मैदानी, साहसी खेळाचे उत्कृष्ट  सादरीकरण केले. तद्वतच उपस्थित मान्यवर यांचे हस्ते राष्ट्रीय स्तरावर खेळाडूचे नेतृत्व केल्यामुळे आशिष जठाळ, सुरज जढाळ, राहुल पवार, मंथन भातारकर, अंकुश मसने, तसेच मेघना अवचार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन

प्रा निखिल नावकार,  प्रास्तविक जय बजरंग व्यायाम शाळेचे प्रशिक्षक मोहन भातारकर यांनी तर प्रा राजदत्त मानकर यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण प्रशिक्षण शिबिर व कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यायाम शाळेचेआजी माजी विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

===========================================
आदिवासी उत्पादीत वस्तूना हक्काचे ‘वनधन विक्री केंद्र’ जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते लोकार्पण
=========
अकोला, दि.2(जिमाका)-   आदिवासी विकास विभाग व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने बिरसा मुंडा वनधन विक्री केंद्राचे उद्धाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होत्या.  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, वन विभागाचे उपवनसंरक्षक के.आर. अर्जूना,  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे, अप्पर आयुक्त आदिवासी विभागाचे सुरेंद्र वानखडे, जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शक केंद्राचे सहायक आयुक्त दत्तात्रय ठाकरे, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, महिला आर्थिक विकास महामंडळचे वर्षा खोब्रागडे, सातपुढा नॅचरल शेतकरी उत्पादक गटाचे रुपेश लढे आदि उपस्थित होते.  
आदिवासी विकास विभाग व जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आदिवासी उत्पादीत वस्तू व साहित्याला हक्काचे विक्री केंद्र मिळाले आहे. यामाध्यमातून आदिवासी उत्पादीत वस्तूना थेट ग्राहकापर्यंत विक्री करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून ग्राहकांना वनऔषधी व नैसगिक साहित्य खरेदी करता येईल, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले.


जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, वन क्षेत्रातील उत्पादीत साहित्याला हक्काचे विक्री केंद्र मिळाले असून यामाध्यमातून आदिवासी समाजाचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच ग्राहकांना नैसर्गिक व वनऔषधी खरेदी करता येईल. आदिवासी महिला बचत गट तयार करुन त्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शनातून साहित्याचे विक्री, पॅकिंग व मार्केटींगबाबत माहिती द्यावी. उत्पादीत साहित्यांचा दर्जा कायम उच्चप्रतीचा राहिल याची दक्षता घ्यावी. या विक्री केंद्राचा वापर केवळ जंगल क्षेत्रातील आदिवासी उत्पादित साहित्य विक्रीकरीताच करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबधिताना दिले.  

तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवात आदिवासी नृत्याव्दारे झाली. कार्यक्रमाचे प्रस्तावना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन उमेदचे व्यवस्थापक नरेंद्र काकड यांनी केले.
========================================
मोटरसायकलवर प्रतिबंदित गुटखा वाहतूक करनारे चालकावर कार्यवाही 1 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त




आज दि, 02,06,22 रोजी मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की एक इसम मोटरसायकल वर गुटखा विक्रिस घेवून जाणार आहे त्यावरून अकोटफएल अकोट रोडावर पुरपीडित कॉलनी जवळ नाकाबन्दी केली असता बिना क्रमांकाची मोटरसायकल जुपिटर वर आरोपी 2 मोठे पोते भरून गुटखा ज्यात विमल, सितार, वाह , राजनिवास, नजर, हॉट, ऐसे प्रतिबन्धक गुटखा 30,000 रुपयांचा व जुपिटर मोटरसायकल 70,000 रुपये असा 1 लाख रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध पो सटे अकोटफैल येथे कलम  328  अनवाये गुन्हा नोंदविन्यात  आलेला आहे
सदर कार्यवाही मा पोलिस अधीक्षक मोनिका राउत मेडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल त्यांच्या पथकाने आज दुपारी 4 वाजता अकोटफएल येथे केली आहे
======================================
वाहनाचे सायलेन्सर बिनापरवांगीने बदलवुन फटाके फोडणा-या बुलेट वाहनावर शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे केली कायदेशीर कार्यवाही



अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणा-या भागात काही खोडकर वाहन चालकांनी मुख्यतः बुलेट वाहनात विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसवुन फटाके फोडण्याचे प्रकार अकोला शहरात वाढले आहे. ज्यामुळे अशा वाहनाव्दारे रस्त्यावर चालनारे वाहन चालक तसेच महीलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची अनेक तक्रारी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी आज दि 02/06/2022 रोजी सायलेन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता विषेश मोहीम राबवुन शहरातील रस्त्यावर फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेले वाहनांचा शोध घेवुन 07 वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.
सायलेन्सरव्दारे फटाके फोडणारे बुलेट वाहन तसेच इतर वाहने ज्यामध्ये कर्णकरकश आवाज करणारे अवैध साहीत्य लावुन शहरातील नागरिकांना त्रास देणा-या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करणेकरीता सदरची  मोहीम अकोला शहरात सतत राबविण्यात येणार आहे. 
करीता अकोला शहरातील सर्व वाहन चालकांना ज्यांचे वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकश आवाज करणारे हाॅर्न लावण्यात आलेले आहे अशा वाहन चालकांना पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन आवाहन करण्यात येते की अशा वाहनांचे सायलेन्सर व हाॅर्न शासन नियमांनुसारच लावावे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येईल.

======================================






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने