बार्शीटाकळी- येथील पंकज वाईन बारला भिषण आग

बार्शीटाकळी-  येथील पंकज वाईन बारला भिषण आग


बार्शीटाकळी येथील पंकज वाईनबारला भिषण आग अकोला - महान मार्गावर असलेल्या पंकज वाईन बारला  पहाटे आग लागण्याचे निदर्शनात आले याआगीत हॉटेल मधील फर्निचर जळून खाक झाले यामध्ये महागळ्या दारू जळून खाक झाल्या आहेत.. या आगीत दोन सिलेंडरचा स्फोट झल्याची माहिती समोर येत आहे. पंकज बार शहरापासून अंतरावर असल्याने आग इतर जागेवर पसरली नाही त्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अकोला महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाचे ही आग आटोक्यात शर्तीचे प्रयत्न नंतर अग्निषमकच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले  ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहेय.या आगीत पंकज वाईन बार च्या संचालकाचे लाखोंचे नुकसान झाल्याचे कळते

वाशिम:- मनसे कडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड.....



वाशिम तालुक्यातील चिखली बु.या गावाला जोडणाऱ्या रसत्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासन  कोणतीच दखल घेत नसल्याने आज  संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनकडून  वाशिम जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाची तोडफोड करण्यात आली

 वाशिम तालुक्यातील चिखली बु.गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्याचं काम त्वरित मंजूर करण्यात येऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही संबंधित विभाग लक्ष देत नसल्याने आज मनसे वाहतूक शाखेच्या वतीनं जिल्हा परिषद बांधकाम विभागात येऊन मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान संबंधित बांधकाम अधिकारयांनी आंदोलन कर्त्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे....

=====================================

वाहाळा ग्रामपंचायत दलित वस्तीतील विकास निधीचा मलिदा लाटल्याचा सरपंचांचा  मा.सचिवावर आरोप



पातुर = सविस्तर वृत्त अशे आहे की पातुर तालुक्यातील ग्रामपंचायत वाहाळा बु. सरपंच सौ प्रितीताई परसराम भोकरे यांनी दिनांक २० /०५/२०२२ रोजी ग्रामपंचायत वाहाळा बु. तत्कालीन सचिव नंदकुमार इंगळे यांनी सन 2021व 22 मध्ये कॉन्टॅक्टर दाराच्या पार्टनरशिप मध्ये राहून दलित वस्तीतील पाईपलाईन व काँग्रेट रस्ते निकृष्ट दर्जाचे करून लाखो रुपयाचे देयक लाटल्याची तक्रार ग्रामपंचायत वाहाळा बु सरपंच सौ प्रीती परसराम भोकरे यांनी केली असता . तक्रारीच्या अनुषंगाने यु एम मोकळकर विस्तार अधिकारी पंचायत समिती पातुर यांनी ग्रामपंचायत वाहाळा बु येथे भेट दिली असता विद्यमान सचिव मेहरे अनुपस्थित होते, प्रत्यक्ष भेट दिली असता असे  निदर्शनात आले की अंगणवाडी येथील शौचालय बांधकाम अर्धवट सोडून देण्यात आले, जलस्वराज व्हेरीवरची मोटर पंप वाहाळा बु येथे न आणून परस्पर नेण्यात आले, नमुना ८ ची रजिस्टर ले नोंद न घेता, परस्पर नमुना 8 देण्यात आले. दलित वस्ती लागून नाली अर्धवट सोडून देण्यात आली.  दलित वस्तीतील सिमेंट काँक्रिट रस्ता तुकाराम खोपे ते तेजराव सुरवाडे यांच्या घरासमोरील रस्ता अर्धवट सोडून देण्यात आला. विद्यमान सचिव याने या संबंधित सर्व रेकॉर्ड पुन्हा तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावे. असे निर्देश तक्रारीच्या अनुषंगाने यु. एम .मोकळकर विस्तार अधिकारी पंचायत समिती पातुर यांनी दिले

किरण कुमार निमकंडे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा न्यूज पातुर

=================================

 विशेष पथकाची जुगार खेळणाऱ्यावर  धाड. 

     आज 3/6/22 रोजी  पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदार कडुन खात्रीलायक बातमी मिळाली कि काशमीर लॉज मागे काही इसम पैश्याच्या हारजीत वर वरली मटका जुगार  खेळत आहे अश्या खात्री लायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहाणी करून रेड केली असता तेथे सलीम खान रोशन खान वय 45 रा. नया बैद पुरा अकोला . त्याच्याकडे वरली मटका साहित्य ,नगदी 5100 रु.असा मुद्देमाल मिळून आला ..त्यांचे हे कृत्य महा. जु. का.अन्वये होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन कोतवाली येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

           *सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक .. जी श्रीधर साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख श्री विलास पाटील साहेब यांनी व त्यांचे पथकाने केली आहे.

==================================

विल लाईन्स ते वृंदावन नगर रस्त्याचे रुंदीकरण तात्काळ करा- मनसे


 

अकोला:-   सिव्हिल लाइन चौका पासून वृंदावन नगर पर्यन्त रोड निर्मिति ला पंचविस वर्षा चा कालावधि लोटला आहे,आणि या रस्त्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि रस्ता अरुंद  झाला आहे, या रस्त्यावर दवाखाने,कोचिंग क्लास,कॉलेज, असल्यामुळे नेहमिच ट्रैफ़िक जाम च्या समस्येला रोजच तोंड दयावे लागत आहे,वाहनधारकांना जीव मुठित घेवून वाहने चालवावी लागत आहेत त्यामुळे एखादी  मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

       तरी ह्या रोडची पहाणी करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे असे निवेदन आज दि ३/६/२०२२ रोजी मनसे अकोला च्या वतीने महापालिका आयुक्त ह्यांना देण्यात आले,काम लवकर न केल्यास मनसे तर्फे मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा पण सदर निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देते वेळी पंकज साबळे मनसे जिल्हाध्यक्ष अकोला,सौरभ भगत शहराध्यक्ष अकोला,मुकेश धोंडफळे विभाग अध्यक्ष, डॉ जय मालोकार उपजिल्हाध्यक्ष मनविसे तसेच सौरभ तिवारी,राहुल मेहता, कैलाश तोष्णिवाल, रवी कान्हेड  , गजानन घावडे, नितीन चंदन, अनूदीप देशमुख, शंकर अंभोरे,

आदी मनसैनिक उपस्थित होते.

===============================

वाहनाचे सायलेन्सर बिनापरवांगीने बदलवुन फटाके फोडणा-या बुलेट वाहनावर शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे केली कायदेशीर कार्यवाही



अकोला शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच नागरिकांची वस्ती असणा-या भागात काही खोडकर वाहन चालकांनी मुख्यतः बुलेट वाहनात विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसवुन फटाके फोडण्याचे प्रकार अकोला शहरात वाढले आहे. ज्यामुळे अशा वाहनाव्दारे रस्त्यावर चालनारे वाहन चालक तसेच महीलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची अनेक तक्रारी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांनी आज दि 03/06/2022 रोजी सायलेन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता विषेश मोहीम राबवुन शहरातील रस्त्यावर फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेले वाहनांचा शोध घेवुन 08 वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.

सायलेन्सरव्दारे फटाके फोडणारे बुलेट वाहन तसेच इतर वाहने ज्यामध्ये कर्णकरकश आवाज करणारे अवैध साहीत्य लावुन शहरातील नागरिकांना त्रास देणा-या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करणेकरीता सदरची  मोहीम अकोला शहरात सतत राबविण्यात येणार आहे. 

करीता अकोला शहरातील सर्व वाहन चालकांना ज्यांचे वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकश आवाज करणारे हाॅर्न लावण्यात आलेले आहे अशा वाहन चालकांना पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन आवाहन करण्यात येते की अशा वाहनांचे सायलेन्सर व हाॅर्न शासन नियमांनुसारच लावावे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने