मुजोर कोचिंग क्लास च्या संचालक वसिम चौधरी वर नियमांचे उल्लंघन केल्याने मनपा प्रशासनाचे पोलीस कार्यवाही चे आदेश
अकोला दि. 3 मुजोर वसिम चौधरी चे क्रुत्य थांबता थांबेना गौरक्षण रोड येथील सी.आय.एफ. जीम संचालकावर पोलीस कारवाई करावी मनपा प्रशासन. तर्फे पोलीस तक्रार करण्यात आली आहे महानगरपालिका दक्षिण क्षेत्रातील गौरक्षण रोड येथील मुक्ता प्रत्येकलाजा या ईमारतीवर सी.आय.एफ.जीम चालविण्यात येत होता. सदर जीमची मनपा दक्षिण झोन कार्यालयामार्फत तपासणी केली असता जीमचे बांधकाम अनाधिकृत आढळून आले तसेच जीम मनपाच्या परवानगी शिवाय चालवित असल्याचे आढळून आल्यावर मनपा दक्षिण झोन कार्यालयामार्फत सदर जीमवर दि. 28/04/2022 रोजी सील लावण्याची कारवाई करण्यात आली. परंतू प्राप्त माहिती नुसार सदर जीमवर दि. 26/05/2022 रोजी पाहणी नंतर जीमच्या चॅनल गेट एका भागाच्या दोन्ही कड्या कापण्यात आलेले व जीमचा वापर करीत असल्याचे आढळून आल्यावर झोन कार्यालयामार्फत घटनास्थळाचा पंचनामा करून सदर जीमच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या शर्टरला कुलूप लावून सील लावण्याची कारवाई करण्यात आली. या कृतीमुळे संबंधीत जीमच्या मालकाने नियमाचे उलंधन केल्याचे स्पष्ट दिसून येते. म्हणून मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये आज दि. 03/06/2022 रोजी सी.आय.एफ.जीमचे मालक वसीम चौधरी यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे तसेच अकोला महानगरपालिकेने लावण्यात आलेली सील त्यांनी मनपाची कोणतीही परवानगी न घेता सील तोडून जीमचा पुर्ववत वापर सुरू केल्याने त्यांच्यावर भा.द.वि.चे कलम 353 तसेच कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी मनपा झोन कार्यालयामार्फत खदान पोलीस स्टेशनला अर्ज देण्यात आला आहे, अशी माहिती दक्षिण झोन क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे यांनी दिली आहे.
====================================
वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उरळ पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल
बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील ३३ वर्षीय महीलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार शिवा रामदास खानझोडे वय २३, रा. लोहारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ महीण्यांपुर्वी लोहारा येथील ३३ वर्षीय महीला ही आपल्या घरी आंघोळ करीत असताना आरोपी याने तिच्या घरात शिरुन पिडीतेचे मोबाईल द्वारे नग्न छायाचित्रे काढली.
व हि छायाचित्रे समाजमाध्यमांवर 'व्हायरल' करण्याची धमकी दिली. तिला चाकुचा धाक दाखवून
वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने नेऊन अत्याचार केले. त्यानंतर वेळोवेळी महीलेला छायाचित्रावरून धमकावून अत्याचार केले; सातत्याने होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून पिडीतेने बुधवारी रात्री उरळ पोलिस स्टेशन गाठून प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आज गुरुवारी रात्री उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीला ताब्यात घेतले.
=======================================
रखरखत्या उन्हात मुर्तीजापुर कारंजा राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी खड्ड्यात बसून ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
मुर्तीजापुर कारंजा राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी पि.एल.सिरसाठ प्रणित ग्रामीण पत्रकार संघ मुर्तिजापूर वतीने २ जून पर्यंत खड्डे बुजवण्याचा इशारा देण्यात आला होता.अन्यथा ३ जुन रोजी खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचे निवेदनाद्वारे नमूद केली होते. याचा कुठलाही परिणाम संबंधित विभागावर झाला नाही.त्यामुळे जनहितासाठी लोकशाही मार्गाने आज दुपारच्या सुमारास रणरणत्या उन्हात जिवघेणे खड्डे बुजवण्यात यावे याकडे संबंधित निगरगट्ट विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मुर्तीजापुर कारंजा राष्ट्रीय महामार्गावरील हातगाव गावाजवळ असलेल्या पुलाजवळील खड्ड्यांमध्ये बसून करण्यात आले.सदर जिवघेणे खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी करण्यात आली.अन्यथा या नंतर खड्डयांचे पुजन , संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव असे तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले, राज्याचे उपाध्यक्ष पि.एन.बोळे,जयप्रकाश रावत,संतोष माने,ऍडडवोकेट निलेश सुखसोहळे,उबैद चाऊस, पंकज सातपुते,उमेश साखरे,अतुल नवघरे,धनराज सपकाळ, बबलु यादव,गोपाल ठक,सुमित सोनोने, गजानन गवई, संदीप कथलकर,उद्धव कोकणे,दिनेश श्रीवास,सोहेल चाऊस तसेच हातगाव येथील गावकरी विजय राऊत,श्रीराम सोळंके,श्रीकुष्ण घाटे,शिवा राऊत,श्रीराम सोळंके,बबन कथलकर,सुधिर शेखार,सागर उघडे,एकनाथ गोपकर,किशोर बोळे,मंगेश डांगे,योगेश सोळंके,विवेक राऊत,राहील वानखडे,मंगेश डांगे या सह आजूबाजूच्या गावातील गावकरी देखील उपस्थित होते.सदर आंदोलन करत असताना बहुतांश वाहन चालकांनी आंदोलन करून त्यांचे कौतुक केले.यावेळी ग्रामिण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांण्डव यांनी उपस्थित राहून चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यांच्यासोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय मानकर सह इतर पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.तसेच शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यादव यांनी देखील पोलिस बंदोबस्त लावला होता.


.jpeg)