हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई शेगोकर विजयी. काँग्रेस पक्षाचे डिपॉझिट 0
हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकर विजयी झाल्या आहेत. एकूण ९५८० पैकी त्यांना सर्वाधिक मते ४३०१ आहेत, तर शिवसेनेच्या अश्विनी गवई यांना२६६० मते प्राप्त झाली आहे, भारतीय जनता पार्टीच्या राधिका पाटेकर२०९१ मते प्राप्त झाली आहेत, तर काँग्रेसच्या रशिका इंगळे ३६२ मते मिळालेली आहे मात्र यामध्ये काँग्रेसचे डिपॉझिट गोल झाले आहे, तर अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या अनिता भटकर यांना ३९ मते प्राप्त झाली आहेत, विशेष म्हणजे अनुसूचित जाती साठी राखीव ह्या मतदार संघात शिवसेना वंचितला पराभूत करण्यासाठि सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि प्रहार ह्या पाच पक्षांला हार पत्करावी लागली
आता पुढील पोट निवडणूक लागणार आहे, व्याळा जिल्हा परिषद येथील सेनेच्या अपात्र होणाऱ्या आणखी एका सदस्याच्या रिक्त होणाऱ्या सदस्यांच्या एससी राखीव जागेवर निवडणुका होऊ घातल्या आहेत, आता या रिक्त पदासाठी वंचित बहुजन आघाडी, शिव सेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, प्रहार, राजकीय पक्ष काय खेडी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,
