ब्रेकिंग न्यूज कुरणखेड येथे मालानी जिनिंग फॅक्टरी ला आग आगीत करोडो रुपयाचे नुकसान

 ब्रेकिंग न्यूज

कुरणखेड येथे मालानी जिनिंग फॅक्टरी ला आग आगीत करोडो रुपयाचे नुकसान

कुरणखेड येथे मालानी जिनिंग फॅक्टरी ला आग आगीत करोडो रुपयाचे नुकसान प्राप्त माहितीनुसार आज सकाळी नऊच्या सुमारास दिपक मलानी, धनराज मालानी, हरीश मालानी , यांच्या मालकीची कुरणखेड येथील असलेल्या जिनिंग फॅक्टरीला आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली यामध्ये जिनिंग फॅक्टरी चे अंदाजे दिड कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे,_आग विझवणे करिता कुरणखेड येथील श्री चंडिका माता आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन आग विजवण्यासाठी शर्तीच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आली आग विझवून याकरिता मुर्तीजापुर नगर परिषद अग्निशामक विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली होती, तसेच शेतामध्ये असलेल्या पंपाने सर्वप्रथम श्री चंडिका माता आपत्कालीन बचाव पथकाने पंप चालू करून आग आटोक्यात आणली यावेळी कुरणखेड येथील श्री चंडिका माता आपत्कालीन पथक चे रंजीत घोगरे, वीरेंद्र देशमुख, योगेश विजयकर, संतोष गोगटे , शहा बादशहा, श्री चंडिका माता आपत्कालीन बचाव पथकाने अथक प्रयत्न केले

========================================


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने