सत्य लढा चैनल ला बातमी प्रसिद्ध होताच अकोला शहरात खाजगी वाहनांचे तसेच ऑटो चालकांचे साम्राज्य विषयी बातमी प्रसिद्ध होताच आज ऑटोचालकावर शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे कारवाई
अकोला सत्य लढा चैनल ला बातमी प्रसिद्ध होताच अकोला शहरात खाजगी वाहनांचे तसेच ऑटो चालकांचे साम्राज्य विषयी बातमी प्रसिद्ध होताच आज ऑटोचालकावर शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे कारवाई ऑटो चालकाना बेशिस्त वाहन चालविने रत्यावर वाहतुकीचे नियम मोडणे, विनापरवाना वाहन चालविणे, विना गणवेश वाहन चालवितांना आढळणे ही बाब गंभीर आहे ज्यामुळे शहरात वाहतुक कोंडी होते व शहरातील इतर वाहन चालकाना नाहक त्रास होतो
त्याअनुशंगाने आज दि. 06/06/2022 रोजी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे विशेष मोहीम राबवुन विना गणवेश ,विना लाइसन , विना इन्शुरन्स व विना वैध परवाना ऑटो वाहन व ऑटो चालक यांचे वर कार्यवाही करून 42 ऑटो शहर वाहतुक नियंत्रण शाखा येथे डिटेन करण्यात आली व त्यावर मोवाका कायद्या नुसार कार्यवाही करण्यात आली
सदर ची मोहीम अकोला शहरात दररोज राबविण्यात येणार असुन शहरातील बेशिस्त ऑटो चालकना शिस्त लागावी या करीता कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी सर्व ऑटो चालक यानी वैध पार्किन ला ऑटो पार्क करावे व वाहतुक नियमाचे पालन करावे अन्यथा मोठ्या प्रमाणात दंड भरन्यास तयार राहवे असे आवाहन श्री विलास पाटील पोलीस निरिक्षक शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे अकोला शहरातील सर्व नागरीकांना करण्यात येत आहे.
==================================

