श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव - वारी पंढरपूरची

 श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव 

नम्र निवेदन

      : वारी पंढरपूरची : 

श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी श्रींची पालखी वारकन्यांसह गेली ५२ वर्ष नित्यनेमाने जात आहे. या वारीची परंपरा श्री संस्थेने आतापर्यंत आलेल्या अनेक अडचणीला सामोरे जावून श्रींचे कृपेने ही परंपरा जोपासलेली आहे.

मागील दोन वर्षापासून कोरोनाचे प्रभावामुळे व शासन निर्देशानुसार सदर वारीची परंपरा दोन वर्षे खंडीत झालेली आहे.

श्री संस्थेचा पायी वारीचा मागील प्रदीर्घ काळातील अनुभव लक्षात घेता, श्री पालखीचे मुक्कामाची जी गांवे आहेत, ती पुर्वी प्रमाणेच कायम राहतील.

तथापि भविष्यातील परिस्थिती विचारात घेवून श्रींचे पालखी दर्शनासाठी होणारी भाविकांची संभाव्य अलोट गर्दी लक्षात घेता, श्री शेगांव ते श्री पंढरपूर व पंढरपूर ते शेगांव या संपूर्ण १३०० .कि.मी. चे पायी वारीचे प्रवासातील श्री पालखी परिक्रमा मार्गातील अरूंद बोळी, अरुंद  रस्ते परिक्रमा मार्गातून वगळण्यात आलेली आहेत. याच बरोबर श्री पालखीचा दुपारचा विसावा व रात्रीच्या मुक्कामाची ठिकाणे, ज्या-ज्या स्थळी जागेचा अभाव, पार्कींगची असुविधा, श्री दर्शन रांगेचे नियोजनाच्या दृष्टीने व्यवस्थेत येणाऱ्या अडी-अडचणी तसेच वारकरी व भाविकांची सुरक्षा आणि सुव्यवस्था आणि सर्वांच्या सोई लक्षात घेवून कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची खबरदारी घेण्याचे दृष्टीकोणातून, आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. कृपया भाविकांनी व सर्व संबंधीतांनी याची नोंद घ्यावी, सहकार्य करावे ही विनंती.

व्यवस्थापकीय विश्वस्त 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने