अकोला शहरात खाजगी वाहनांचे तसेच ऑटो चालकांचे साम्राज्य स्कूल बस मधून होत आहे खाजगी वाहतूक आर टीओ चे मात्र दुर्लक्ष ?
अकोला शहरात खाजगी वाहन चालकाचे साम्राज्य अकोला शहरातील मध्यभागी असलेल्या बस स्टॅन्ड क्रमांक एक व बस स्टॅन्ड क्रमांक दोन च्या अवतीभवती खाजगी वाहनांचे साम्राराज्य दिसून येत आहे, प्राप्त माहितीनुसार या दोन्ही बस स्टॅन्ड च्या बाजूला खाजगी वाहन हे दोनशे मीटरच्या अंतरावर दिसाला नको मात्र असे होतांना दिसून येत नाही या दोन्ही बसस्टँडच्या अगदी कडेला लागून खाजगी वाहन लावली जात आहेत, त्यामध्ये काही खाजगी बसेस, ऑटो ,स्कूल बसेस मधून खाजगी वाहतूक सर्रास वाहतूक होताना दिसून येत आहे, एसटी परिवहन मंडळाचे
मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे,त्याबरोबरच माऊंट कारमेल समोरील उड्डाणपूल रस्त्यावर खाजगी वाहने ही दिवसभर उभी असतातच रात्रीच्या वेळी उडानपुल रस्त्यावरया खाजगी वाहनांचे पार्किंग स्थळ निर्माण झाले आहे , तसेच जुने बसस्टँड वर नवीन बसस्टॅन्ड परिसरात वाहने उभी केली जातात शहरातील पहिलेच अरुंद रस्ते त्यामध्ये रस्त्याला असलेले अतिक्रमण हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, त्यामध्ये शहरातील ऑटोची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, काही आटो हे विनापरवाना शहराच्या रस्त्यावर धावत असल्याचे दिसून येत आहेत, याचऑटो चालकांची सुद्धा मनमानी वाढली आहे, चौकाच्या मधोमध ऑटो उभे करणे तसेच रस्त्याच्या मधोमध ऑटो उभी करणे त्यामुळे रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीसअडचण निर्माण होत आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अपघात होत आहेत ,या खाजगी वाहनांना तसेच ऑटो चालकांना कोणी मुभा दिली हे मात्र एक कोडेच ? पोलीस प्रशासन तसेच आर टीओ विभाग महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत असल्याची ओरड सामान्य नागरिका कडून होत आहे, हे खाजगी वाहने शहराबाहेर असलेले लक्झरी स्टॅन्ड या ठिकाणी ही वाहने उभी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे, या खाजगी वाहतूक तसेच ऑटो चालकांवर कडक कारवाई करिता पोलीस प्रशासन आर टीओ विभाग अकोला महानगरपालिका एकत्रित येऊन काम केल्यास शहरातील वाहतुकीची समस्या नक्कीच मिटेन अशी अपेक्षा अकोला शहरातील सामान्य नागरिक करीत आहे-
====================================
तुळसाबाई कावल मध्ये पर्यावरण दिवस साजरा
पातुर स्थानिक तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे एनसीसीच्या कॅडेट्सनी वृक्षदिंडी काढून पर्यावरण दिवस साजरा केला.
इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला चे लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला सर यांच्या मार्गदर्शना मध्ये जिल्ह्यामध्ये पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. त्यामध्ये तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथील एनसीसी विभागामार्फत पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. वृक्ष दिंडीचे आयोजन विद्यालया मधून पोलीस स्टेशन पातुर पर्यंत करण्यात आले. दिंडी मध्ये विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. विद्यालया मार्फत फळांचा राजा आंबा ची कलम हरीश गवळी ठाणेदार पोलीस स्टेशन पातुर यांना पर्यावरण दिनानिमित्त देण्यात आले. एनसीसी सार्जंट गौरी सरोदे वफाई खान पठाण यांच्या नेतृत्वात दिंडी काढण्यात आली .दिंडीला हिरवी झेंडी देण्याकरिता तालुका पत्रकार संघाचे प्रतिनिधी श्री सतीश सरोदे सर, शारीरिक शिक्षक श्री डी एम राणे सर उपस्थित होते.
एनसीसी कॅडेट्स चे कौतुक प्राचार्य अंशुमनसिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण, उपमुख्याध्यापक आर एस ढेंगे , पर्यवेक्षक एम बी परमाळे यांनी केले. एनसीसी कॅडेटस ला मार्गदर्शन सुभाष इंगळे एनसीसी ऑफिसर यांनी केले.
====================================
पातुरच्या स्मशानभूमीत मुंडन करण्यासाठी सलून खुर्चीची व्यवस्था
अभ्युदय फाउंडेशनच्या आवाहनाला नाभिक समाजाचा प्रतिसाद नाभिक युवक दुकानदार संघटनेने घेतला पुढाकार
पातूर : पातुरच्या हिंदू स्मशानभूमीत दशक्रिया विधिकारिता येणाऱ्या आप्तेष्टना मुंडन करण्यासाठी आता आरामदायी सलून खुर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे. अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने केलेल्या आवाहनाला नाभिक समाजाने सकारात्मक प्रतिसाद देत सलून खुर्ची दान केली आहे.अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सेवा देण्यासाठी पातुरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने व्रत हाती घेतले आहे. या ठिकाणी विविध सोयी अभ्युदय फाउंडेशनने उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला नागरिक, सामाजिक संस्था प्रतिसाद देत आहेत. त्यानुसार दिवाकर राजनकर यांच्या आई द्वारकाबाई जयराम राजनकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पातुरच्या नाभिक समाजाने पुढाकार घेत नाभिक युवक दुकानदार संघटनेमार्फत सलून खुर्ची अभ्युदय फाउंडेशनच्या सेवाकार्याला अर्पण केली.
दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना तसेच दिव्यांगना मुंडन करण्यासाठी खाली बसण्याचा त्रास होतो. यासाठी सलून खुर्चीची व्यवस्था स्मशानभूमीत असावी याबाबत अभ्युदय फाउंडेशनने आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत या सलून खुर्चीचा लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी नाभिक युवक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दिलीप खाकरे, तालुका अध्यक्ष विजय अंबुसकर, प्रमोद राजनकर, जगदीश निंबोकार, शाम राव, नरेंद्र लापूरकर, नरेंद्र घुले, विश्वास निंबोकार, जयदीप कुकडकर, राजूभाऊ चतारकर, अंबादास धानोकर, पुरुषोत्तम कुकडकर, विष्णू निंबोकार, आशिष राव, दत्ता निंबोकार, गोपाल चतारकर, संजय राव, बबन चतारकर, अमोल अंबुलकर, दत्ता राजनकर, विजय राजनकर, गजानन धामणकर आदींनी अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रविण निलखन, दिलीप निमकंडे आदीं पदाधिकाऱ्यांना समर्पित केली.
===================================


