आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या पालखीचे पंढरपूर साठी प्रस्थान...
गण गण गणात बोते च्या गजरात दुमदुमले प्रस्थान मार्ग... ८ व ९ जून ला श्रींच्या पालखीचे अकोला शहरात आगमन...
शेगाव : गेल्या दोन वर्षापासून करोना चे सावट असल्यामुळे तसेच प्रशासनाने निर्बंध लावल्यामुळे श्रींच्या पालखीचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र यावर्षी श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखीचे भजनी दिंडी, गज व अश्वासह 6 जूनला सकाळी 7 वाजता पंढरपूर कडे हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान झाले.
श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे 53 वे वर्ष आहे. श्री क्षेत्र पंढरपूरला पायी हजारो किलोमीटरचा प्रवास होणार आहे. श्रींच्या पालखीला शहरातील श्रींचे प्रगटस्थळ, नागझरी रोड वरील शेगाव संस्थेचे सदस्य अशोक देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ, चहा देण्यात देण्यात आले.
तद्नंतर श्रींची पालखीचे बुधवार, 6 जून ला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान केले. संतनगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप देतात. श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच श्रींच्या पालखीचे गावातील नागरीकांकडून मनोभावे श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत करण्यात आले. आज संध्याकाळी श्रींच्या पालखीचे मुक्काम पारस येथे राहणार आहे, उद्या गायगाव येथे दुपारी श्रींची पालखी चे आगमन होणार आहे, तसेच दिनांक 7 रोजी भोरद येथे सायंकाळचे मुक्काम राहणार आहे. दिनांक 8 व 9 जून रोजी श्रींच्या पालखीचे अकोला शहरात आगमन होणार आहे.अकोला शहरातही जागोजागी श्रींच्या पालखीचे स्वागत करून दर्शनाचा लाभ घेत असतात.. महाराजांवर अपार श्रद्धा असल्याने नागरिक गण चातक पक्षा प्रमाणे पालखीची वाट पाहत आहेत, त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून ते दर्शनाचा लाभ घेणार आहे...
.jpeg)